मातोंड- पेंडूर येथील श्री देव घोडेमुख देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव आज मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न

16

 

सावंतवाडी (प्रतिनिधी)

मातोंड- पेंडूर येथील श्री देव घोडेमुख देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव आज मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न

मातोंड- पेंडूर येथील श्री देव घोडेमुख देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव आज मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या जत्रोत्सवाला सकाळपासूनच भाविकांनी अलोट गर्दी केली होती. डोंगरावर स्थित असलेल्या श्री देव घोडेमुखाचे अर्थात शिवमार्तंडेश्वराचे दर्शन घेण्यासाठी भाविकानी मोठी गर्दी केली होती.

तसेच देव घोडेमुखाच्या चाळ्यांना हजारो भाविकांकडून परंपरेप्रमाणे कोंब्याचा मान देण्यात आला.
भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या शिवमार्तंडेश्वर ३६० चाळ्यांचा अधिपती म्हणून श्री घोडेमुख देवस्थान प्रसिद्ध आहे. सावंतवाडी शिरोडा मार्गावर सावंतवाडीपासून साधारण १५ किलोमीटरवर रस्त्याला लागून असलेल्या निसर्गरम्य डोंगराच्या एका कड्यावर हे देवस्थान वसलेले आहे. जत्रोत्सवानिमित्त शुक्रवारी सकाळपासूनच श्री देव घोडेमुखाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. मंदिर डोंगरावर असल्याने वयोवृद्ध भाविकांना डोंगर चढणे अवघड असल्याने डोंगराच्या पायथ्याशी केळी नारळ ठेवण्याची व्यवस्था देवस्थान कडून करण्यात आली होती. तर बऱ्याच संख्येने भाविकांनी तब्बल ७०० ते ८०० मीटर डोंगर चडून श्री देव घोडेमुखाचे दर्शन घेतले.

 

या जत्रोत्सवाला सिंधुदुर्ग जिल्ह्यासाहित मुंबई, गोवा, कर्नाटक, कोल्हापूर, व इतर भागातील भाविक दाखल झाले होते. कोंबड्याची जत्रा म्हणून ही जत्रा प्रसिद्ध असल्याने तसेच श्री देव घोडेमुखाला कोंबड्याचा मान देण्यात येत असल्याने जत्रोत्सवाच्या परिसरात कोंबे विक्री साठी ठेवण्यात आले होते.

 

अनेकांकडून ते विक्री करण्यासाठी मोठी लगबग दिसून येत होती. दुपारनंतर भाविकांची गर्दी अधित वाढत गेल्याने आणि हा जत्रोत्सव मुख्य रस्त्यावर पार पडत मुंबई शिरोडा महामार्गावर तब्बल तीन ते चार तास वाहतूक कोंडी झाली होती.