Home आचरा साने गुरुजींचा जीवन पट उलगडत मुलांना केले मार्गदर्शन

साने गुरुजींचा जीवन पट उलगडत मुलांना केले मार्गदर्शन

4
आचरा–अर्जुन बापर्डेकर

साने गुरुजींचा जीवन पट उलगडत मुलांना केले मार्गदर्शन

बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण आयोजित न्यू इंग्लिश स्कूल ,आचरा येथे हेरंब कुलकर्णी यांनी केले मार्गदर्शन
साने गुरुजी जन्मशताब्दी वर्षानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ,आचरा या ठिकाणी कवी , शिक्षणतज्ञ , समाजसेवक .हेरंब कुलकर्णी यांनी साने गुरुजी जीवनप्रवास विद्यार्थ्यांना विस्तृत स्वरूपात सांगितला . साने गुरुजींचे विद्यार्थी म्हणून वैशिष्टये , विद्यार्थी व शिक्षक प्रसंग , स्वातंत्र्य सेनानी जेल मधील शिक्षा साने गुरुजींचे जेल मधील प्रसंग , अध्यात्मिक व नैतिक विचार लिहलेले पत्रे , वंचितासाठी चे साने गुरुजी कार्य या विषयी सखोल माहिती दिली या व्याख्यानाचा लाभ इयत्ता अकरावी व बारावी वाणिज्य व कला शाखेतील विद्यार्थ्यांनी घेतला .
या कार्यक्रमाचे आयोजन इंग्रजी माध्यम शालेय समिती सदस्य मंदार सांबारी यांनी केले . कार्यक्रमाच्या वेळी शाळेचे उपमुख्याध्यापक घुटुकडे सर ,नाथ पै सेवांगण ,मालवण व्यवस्थापक संजय आचरेकर, खजिनदार खंडाळेकर सर ,सौ .प्रतिमा कुलकर्णी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ दतात्रय जाधव सर यांनी केले व आभार प्रदर्शन संदीप रावले यांनी केले.
कार्यक्रमासाठी धी आचरा पीपल्स एज्युकेशन मुंबई अध्यक्ष डॉ० प्रदीप मिराशी कार्यअध्यक्ष प्रदीप परब मिराशी ,स्थानिक समिती यांचे सहकार्य लाभले