सावंतवाडी येथे संयुक्त योगोपचार शिबिर

12

 

सावंतवाडी (प्रतिनीधी)

सावंतवाडी येथे संयुक्त योगोपचार शिबिर

पतंजलि योग समिती सिंधुदुर्ग मार्फत सावंतवाडी शहरामध्ये संयुक्त योगोपचार शिबि गुरुवार 5 डिसेंबर 2024 ते 9 डिसेंबर 2024 दरम्यान होत आहे. सकाळी 5:30 ते 7:30 या वेळेत दररोज 5 दिवशीय शिबिर संपन्न होणार आहे .

सूर्यनमस्कार, प्राणायाम, योगासन, ऍडव्हान्स योग, आयुर्वेद तसेच योगोपचार आणि आध्यात्मिक उन्नती बाबत विशेष वर्ग होतील. या शिबिरात मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा, सांधेदुखी, हृदयविकार या व्याधींच्या निवारणासाठी विशेष मार्गदर्शन दिले जाईल. वैश्य भवन, गवळीतिठा, सावंतवाडी येथे सदर शिबिर होणार आहे.

सर्व योगाभ्यास प्रेमी पुरुष, महिला तसेच लहान मुलांनी या योगशिबिराचा अवश्य लाभ घ्यावा.

योग शिबीर निःशुल्क आहे त्यामुळे सर्वांनी याचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी शेखर बांदेकर 9823881712, महेश भाट 9975543446 , रामनाथ सावंत 9423301475, अनिल मेस्त्री 9403560033 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे.