आचरा (अर्जुन बापर्डेकर)
आचरा गावूडवाडी येथे श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा २६ नोव्हेबर पासून२८ नोव्हेंबर पर्यंत चालणारया या सोहळ्यात विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम
आचरा गाऊडवाडी येथील श्री दत्त मंदिर येथे मंगळवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा साजरा होणार आहे.
२८नोव्हेंबर पर्यंत चालणारया या सोहळ्यात मंगळवारी सकाळी नऊ वाजता श्रींची स्थापना पूजा आरती तीर्थप्रसाद दुपारी बारा वाजता हरिपाठ पसायदान सायंकाळी सात ते आठ हरिपाठ व पसायदान रात्री साडेनऊ वाजता हभप मृणाल गावकर शिरवंडे तालुका मालवण यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे बुधवार २७ रोजी सकाळी दहा वाजता पूजा आरती दुपारी बारा वाजता हरिपाठ दुपारी एक ते दोन महाप्रसाद सायंकाळी पाच ते सहा परमपूज्य कलावती देवी यांचे भजन ,साडेनऊ वाजता अमर गावकर भंडारवाडी यांचे सुश्राव्य भजन ,गुरुवारी २८ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता पूजा व आरती दुपारी बारा वाजता हरिपाठ सायंकाळी पाच ते आठ ज्येष्ठ नागरिकांची स्वरयात्रा रात्री साडेनऊ वाजता श्री महापुरुष प्रासादिक दिंडी भजन मंडळ त्रिंबक साटमवाडी यांचे दिंडी भजन होणार आहे तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन दत्तप्रसादिक मंडळ आचरे गावूडवाडी यांनी केले आहे .





