सावंतवाडी (प्रतिनिधी)
कलावंतांना न्याय देण्यासाठी कटीबध्द : अर्चना घारे-परब
सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख असणारे दशावतार तसेच भजनी कलावंत यांची कमिटी बरखास्त केली गेली आहे. यामुळे कलाकारांना मिळणार मानधनापासून, नोंदणीपासून वंचित राहावे लागते आहे. राज्यात आमचे सरकार आल्यानंतर पहिल्या तिन महिन्यात पहिल्यांदा ही कमिटी पुन्हा सुरू करणार असल्याची ग्वाही अपक्ष उमेदवार अर्चना घारे-परब यांनी दिली. मतदारसंघातील कलावंतांना भेटीदरम्यान तसा विश्वास सौ. घारे यांनी दिला आहे.





