नेमळे येथे गावभेट दौऱ्यात  तेलीची केसरकरांवर टीका

19

 

सावंतवाडी,१०,नोव्हेंबर

 

नेमळे येथे गावभेट दौऱ्यात  तेलीची केसरकरांवर टीका

येथील मतदार संघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या हेकेखोरपणा आणि हट्टीपणामुळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सारखा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला नाही.त्यामुळे अशा निष्क्रिय आणि खोटारड्या आमदाराला घरी बसवा.केसरकरांनी मतदार संघाचा विकास केला तर साड्या का वाटाव्या लागतात असा सवाल महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी आज येथे केला.सावंतवाडी तालुक्यातील नेमळे येथे गाव भेट दौरा आयोजित करण्यात आला होता यावेळी श्री तेली बोलत होते. यावेळी त्यांनी केसरकरांवर टीका केली.

 

यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख रुपेश राऊळ, तालुकाप्रमुख मायकल डिसोझा, तातो राऊळ विनोद काजरेकर रमेश गावकर सचिन मुळीक संदीप पांढरे प्रशांत बुगडे सिताराम राऊळ शामसुंदर मालवणकर महेश मालवणकर निळू गावडे सुरेश राऊळ भगवान पाटकर महादेव घोगळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

         श्री तेली बोलताना पुढे म्हणाले सावंतवाडी मतदारसंघाचा केसरकरांनी विकास केला तर त्यांना साड्या वाटप विविध आमिषे का दाखवावी लागतात तुम्ही विकास केला तर जनता तुमच्या पाठीशी का नाही असे अनेक प्रश्न त्यांनी यावेळी केले तर या मतदारसंघात शिवसेनेच्या तिकिटावर दोन वेळा निवडून येऊन मतदार संघातील मतदारांचा अपमान करून शिवसेनेची गद्दारी करणाऱ्या केसरकरांना हीच जागा दाखविण्याची वेळ आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी मला या ठिकाणी एकदा जनतेची सेवा करण्याची संधी द्या तुम्हाला अपेक्षित विकास नक्कीचच करेन आजची निवडणूक ही भविष्य घडविणारी आहे त्यामुळे मतदारांनी जागरूकपणे ठाकरे शिवसेनेला मतदान करावे आज या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत आहे त्यामुळे सर्वांनी मशाल या चिन्हा समोर बटन दाबून मतदान करावे येत्या एक वर्षात माझ्या हातून या ठिकाणी महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागताना दिसतील असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

       श्री राऊळ म्हणाले श्री तेली हे प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेले उमेदवार आहेत त्यामुळे श्री तेली यांना नेमळे गावातून 500 पेक्षा जास्त लीड देण्यासाठी प्रयत्न करा, त्यासाठी लागेल ते सहकार्य मी करेन. तेली यांच्या रूपाने या मतदारसंघाला आमदार मिळाल्यास ठाकरे शिवसेनेला नक्कीच बळकटी मिळणार आहे तसेच आपण आपल्या गावासाठी हक्काने विकास कामे आणू शकतो त्यामुळे तेली यांना मतदान करा घराघरात मशाल चिन्ह पोहोचवा तुम्हाला निंबळे गावात लागेल ते सहकार्य करण्यासाठी आम्ही तयार आहोत येत्या एका वर्षात मतदार संघाचा विकास काय असतो ते दाखवून देऊया त्यासाठी एकजुटीने काम करा असे आवाहन त्यांनी केले