महाविकास आघाडीतर्फे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. राजन तेली यांना प्रचंड बहुमतांनी निवडुन आणण्यासाठी सावंतवाडी शहरातील महाविकास आघाडीमधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस व शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक राजन तेली व माजी राज्यमंत्री श्री. प्रवीण भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सोमवारी सायंकाळी उशिरा पार पडली.
यावेळी या बैठकीस माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे तालुका प्रमुख मायकल डिसोजा, सावंतवाडी महिला शहर प्रमुख श्रुतिका दळवी , भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष ॲड राघवेंद्र नार्वेकर, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाची युवती जिल्हाध्यक्ष सौ. सावली पाटकर , कोकण विभागीय अध्यक्ष सोशल मीडिया फ्रंट सचिन पाटकर, बाबल्या दुभाषी, माजी नगरसेविका सौ. अफरोज राजगुरु, माजी नगरसेवक उमेश कोरगावकर आदि महाविकास आघाडीमधील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.