मंत्री तथा आमदार दीपक केसरकर पुन्हा आमदार म्हणून निवडून येतील म्हणजेच ते विजयाचा चौकार मारणार – महेश धुरी
भाजप माजी जिल्हा अध्यक्ष राजन तेली यांनी नुकताच उबाठा शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या जाण्याने भाजपचे कोणतेही नुकसान होणार नाही. सावंतवाडी मतदारसंघात भाजपला मानणारे मतदार विरोधकांच्या भुलथापांना बळी पडणार नाहीत. मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यावेळी चौथ्यांचा आमदार म्हणून निवडून येतील. म्हणजेच ते विजयाचा चौकार मारणार असल्याचे, बांदा मंडल सावंतवाडी भाजप तालुकाध्यक्ष महेश धुरी यांनी सांगितले.
शेर्ले येथे आयोजित पत्रकार परिषदेत धुरी बोलत होते. ते म्हणाले, गतकाळत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्फत कोट्यवधींचा निधी विकासकामांसाठी देण्यात आला. त्याचे श्रेय विरोधकांनी घेऊ नये. जनता सुज्ञ आहे विरोधकांच्या भुलथापांना बळी पडणार नाही. राजन तेली यांनी आता उबाठामधून निधी आणून मतदारसंघाचा विकास करून दाखवावा. भाजपचा निधी वापरून स्वतःतचा प्रचार करणे योग्य नाही, असे महेश धुरी म्हणाले.
महायुतीचा उमेदवार म्हणून दीपक केसरकर रिंगणात आहेत. त्यांना बहुमतांनी निवडून आणण्याचे आमचे लक्ष आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे असे आवाहन भाजप बांदा मंडल तालुकाध्यक्ष महेश धुरी यांनी केले.