सावंतवाडी : श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त श्री कुलदेवता प्रासादिक भजन मंडळ मळेवाड, देऊळवाडी यांच्यावतीने विविध मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं आहे. मुलांच्या कौशल्य गुणांना चालना देण्यासाठी काही स्पर्धा शालेय स्तरावर घेण्याचं मंडळाच्यावतीने निश्चित झालं आहे.
यामध्ये गोळा फेक स्पर्धा, भाला फेक स्पर्धा, थाळी फेक स्पर्धा या प्राथमिक गट ( 5वी -7वी ), माध्यमिक गट ( 8वी -10वी ), उच्च माध्यमिक गट ( 11वी -15वी ) या तीन गटांमध्ये घेण्यात येणार आहेत. मुलींचा गट वेगळा असेल आणि मुलांचा गट वेगळा असणार आहे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून विद्यार्थ्यांकडून कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही आहेत.
सर्व गटातून प्रथम तीन क्रमांक काढले जाणार आहेत. विजेत्यांना प्रशस्तीपत्र, मेडल आणि रोख पारितोषिक दिले जाणार आहे. ही स्पर्धा शालेय स्तरावर असल्यामुळे येताना सर्व विद्यार्थ्यांनी आपलं ओरिजनल आधारकार्ड घेऊन यायचं आहे. या स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिवशी सकाळी 11:00 वाजता सुरु होतील.
सायंकाळी 07:30 वाजता रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. पुरुष रस्सी खेच स्पर्धा ही खुली स्वरूपाची स्पर्धा आहे. यामध्ये विजेता संघ 7000/- रुपये पारितोषिक आणि उपविजेता संघ 5000/- रुपये पारितोषिक. महिला रस्सी खेच स्पर्धा ही मळेवाड गाव मर्यादित स्पर्धा आहे. यामध्ये मळेवाड गावातील स्पर्धक आणि संघ सहभागी होणार आहेत. महिला आणि पुरुष रस्सीखेच स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क असणार आहेत. सर्व स्पर्धांसाठी परीक्षक वर्ग स्वतंत्र असणार आहेत.
नाव नोंदणीसाठी संपर्क क्रमांक – श्रीकृष्ण माळकर -8830695914, बबलू नाईक -8390746588, नंदू मुळीक -9403085707




