सावंतवाडी (मंगल कामत)
सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीची महत्वाची बैठक संपन्न
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षची संयुक्त बैठक शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार राजन तेली व माजी राज्यमंत्री प्रविण भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत आज संपन्न झाली.
यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ,तालुका प्रमुख मायकल डिसोजा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महेंद्र सांगेलकर, ऍड.राघवेंद्र नार्वेकर,संदीप सुकी, बाबुराव परब,संजय लाड, अभय मालवणकर,शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे महिला जिल्हाध्यक्षा ऍड.रेवती राणे, सत्यवान साटेलकर, नम्रता कुबल, नितीन कुबल,चंद्रकांत राणे आदी उपस्थित होते.





