सावंतवाडी (मंगल कामत)
ज्येष्ठ साहित्यिक कै.पु.रा. बेहेरे यांची जन्मशताब्दी सोहळा साजरा करण्याचे आयोजन
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीतील आजगाव गावचे सुपुत्र तथा नवशक्तीचे संपादक, लेखक, ज्येष्ठ साहित्यिक कै.पु.रा.बेहेरे यांची चालूवर्षी जन्मशताब्दी आहे. हा जन्मशताब्दी सोहळा साजरा करण्याचे आयोजन त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आलेय. २९ एप्रिल २०२५ रोजी त्यांचे मूळगाव आजगाव येथे कै.पु.रा.बेहेरेंच्या फोटो चरित्रांचे प्रकाशन केले जाणार असल्याची माहिती त्यांचे सुपुत्र तथा इम्पोसेसचे माजी संचालक वासुदेव बेहेरे यांनी दिली. आयोजित पत्रकार परिषद आयोजित ते बोलत होते.





