भारतरत्न डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून भगवान बुद्ध यांचे ही घेतले आमदार राणेंनी दर्शन
कणकवली दि २८ ऑक्टोबर (प्रतिनिधी)
कणकवली बुद्ध विहार येथील भगवान बुद्ध मूर्तीचेही घेतले दर्शन
आमदार नितेश राणे यांनी महायुतीचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कणकवली बुद्ध विहार येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. त्याच प्रमाणे बुद्ध विहार येथील भगवान बुद्ध मूर्तीचे दर्शन घेतले.यावेळी आमदार नितेश राणे यांच्यासोबत भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





