23 नोव्हेंबरला कणकवली विधानसभेवर विजयाचा भगवा फडकवूया – सुशांत नाईक

120

 

कणकवली दि 28 (तुळशीदास कुडतरकर)

 

23 नोव्हेंबरला कणकवली विधानसभेवर विजयाचा भगवा फडकवूया – सुशांत नाईक

 

 

विधानसभा निवडणुकीत आपल्याला मशाल चिन्ह हे घरोघरी पोहचून. येणाऱ्या 23 नोव्हेंबर ला कणकवली विधानसभेवर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संदेश पारकर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करूया. असे आवाहन युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केले. जाणवली विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जाणवली विभागात संघटना मजबूत करण्यासाठी पदाधिऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. सुशांत नाईक यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार यांनी देखील उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते, यांना मार्गदर्शन केले. या आढावा बैठकीस कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

यावेळी जिल्हाप्रमुख , युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, सुदाम तेली, अवी गिरकर, हर्षद गावडे, राजू शेट्ये, प्रवीण कदम व आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.