सावंतवाडी (संपत मराठे)
अरे बापरे.. दरीत जेसीबी कोसळला…. चालकासह चौघे सुखरूप मळगाव येथील घटना
मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासवर मळगांव भाईनभाटले पूलानजिक बाजूने आलेल्या ट्रकला साईड देण्याच्या प्रयत्नात जेसीबी महामार्गावरून डाव्या बाजूला खोल असलेल्या दरीत’ कोसळला. मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासवर मळगांव भाईनभाटले पूला लगत हा प्रकार घडला. सुदैवाने या अपघातात जेसीबी चालकासह त्याच्यासोबत असलेले तिन्ही साथीदार बालबाल बचावले.





