वैभववाडी (तुषार शिंगाडे)
वैभववाडी तालुका भाजपा भटके विमुक्त आघाडी पदाधिकारी संवाद बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद
भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नवलराज काळे सर्व सहकाऱ्यांच्या सोबत कोकण प्रदेश उपाध्यक्ष बाळा गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत वैभववाडी तालुक्यातून विधानसभा निवडणूक प्रचाराच्या मैदानात उतरले असून वैभववाडी तालुका भाजपा भटके विमुक्त आघाडी पदाधिकारी संवाद बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या बैठकीला प्रदेश उपाध्यक्ष बाळा गोसावी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष भाजप नेते नासिर काझी वैभववाडी तालुका भाजप मंडलाध्यक्ष सुधीर नकाशे, भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हा उपाध्यक्ष मारुती मोहिते जिल्हा सल्लागार अंबाजी हुंबे, वैभववाडी तालुका अध्यक्ष गंगाराम अडूळकर, भटके विमुक्त आघाडीचे नेते माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण, माजी नगर पंचायत बांधकाम सभापती संतोष पवार, तालुका वैभववाडी उपाध्यक्ष गंगाराम शिंदे शामराव शेळके, प्रकाश पवार, शहराध्यक्ष संतोष निकम, तालुका सल्लागार दाजी बर्गे,तालुका संपर्कप्रमुख नवलकुमार झोरे, युवक तालुका अध्यक्ष अनिल कोकरे, युवक तालुका सरचिटणीस निलेश शेळके, तुषार शिंगाडे, अक्षय मोहिते, आबा लसणे, आदित्य चव्हाण व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोकणातील सर्व जागेवर महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे प्रदेश उपाध्यक्ष तथा कोकण प्रभारी बाळा गोसावी यांनी सांगितले.वैभववाडी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांनी मोठे योगदान दिले आहे महायुतीने भटक्या विमुक्तांसाठी विविध योजना राबवून समाजाला न्याय देण्याचं काम केलं आहे विरोधकांकडे अफवा पसरवणे हाच एक मुद्दा आहे विरोधकांकडून विकास कामे झालेली नसून चुकीची माहिती समाजात पसरून समाजाचं मतपरिवर्तन करण्याचा केविलवाणा प्रयत्न चालू आहे. तो सर्व पदाधिकाऱ्याने हाणून पाडायचा आहे व जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहायचे आहे असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष श्री नवलराज काळे यांनी केले.
यावेळी तालुका निहाय गाव बैठका, वाडी बैठका करण्याचे नियोजन झाले तालुका अध्यक्ष सुधीर नकाशे भाजप नेते नासिर काझी यांच्या प्रमुख उपस्थितीत हे नियोजन अंतिम करण्यात आले. तसेच महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार नितेश राण व इतर पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत वैभववाडी तालुका भाजप भटके विमुक्तांचा मेळावा आयोजित करण्याचे देखील नियोजन या बैठकीत करण्यात आले आहेत.
यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी मोठं मताधिक्य देण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आश्वासन दिले आहे.






