कणकवली शहरातून आमदार नितेश राणे यांना मोठे मताधिक्य मिळवून देणार ; कणकवली शहर भाजपाच्या बैठकीत निर्धार – माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती

13

 

कणकवली दि २१ ऑक्टोबर (प्रतिनिधी) 

 

कणकवली शहरातून आमदार नितेश राणे यांना मोठे मताधिक्य मिळवून देणार ; कणकवली शहर भाजपाच्या बैठकीत निर्धार – माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती

 

भाजपाचे कणकवली मतदारसंघाचे उमेदवार आमदार नितेश राणे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार आज कणकवली शहर भाजपाच्या बैठकीत करण्यात आला. कणकवली शहरातून आमदार नितेश राणे यांना मोठे मताधिक्य देणार असून त्या अनुषंगाने उद्यापासून बूथ निहाय बैठका घेण्यात येणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

 

कणकवली शहरातील प्रत्येक जनतेपर्यंत काम या निवडणुकीच्या माध्यमातून पोहोचवा व पुन्हा एकदा जनतेला आवाहन करा असे श्री नलावडे यांनी सांगितले. या बैठकीला माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासोबत भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, माजी जिल्हा उपाध्यक्ष राजश्री धुमाळे, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, माजी नगरसेवक मेघा सावंत, शहराध्यक्ष प्राची कर्पे, माजी नगरसेवक विराज भोसले, शिशिर परुळेकर आदी उपस्थित होते.