बांदा (प्रतिनिधी)
बांदा चेकपोस्टवर बेकायदा दारूचे मोठे घबाड ; ८६ लाखांच्या दारुसह १ कोटीचा मुद्देमाल जप्तबांदा पोलिसांची कारवाई
गोव्यातून नालासोपारा येथे बेकायदा होणाऱ्या गोवा बनावटीच्या दारू वाहतुकी विरोधात बांदा पोलिसांनी चेकपोस्टवर कारवाई केली. या कारवाईत ८६ लाख ४० हजार रुपयांची दारू व २० लाखांचा ट्रक असा एकूण १ कोटी ६ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारू वाहतुक केल्याबद्दल शिवाजी महादेव शिंगाडे (५३) व विद्यासागर बापू ऐतवडे (४०, दोघेही रा. बेडग, मिरज, सांगली) यांच्यासह विनापरवाना दारू मुद्देमाल भरून देणाऱ्या दोघा अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.





