कौतुकास्पद | गजेंद्र कोठावळेला राष्ट्रीय कला गौरव पुरस्कार

सावंतवाडी : इन्सुली बिलेवाडीमधील युवा कलाकार गजेंद्र शाम कोठावळे यांना 2023 वर्षाचा बुलडाणा फिल्म सोसायटीचा राष्ट्रीय कला गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.

लहाणपणापासून भजन, नाटक, बॅन्जो यांची आवड असलेले आणि साधारण गेली 5-10 वर्ष चित्रपट क्षेत्रामध्ये काम करत असलेले गजेंद्र कोठावळे हे 2023 चे बुलडाणा फिल्म सोसायटीचे सिंधुदुर्गमधून राष्ट्रिय कला गौरव पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव त्यांच्यावर केला जातो आहे.