निशांत तोरसकर यांची भाजपला सोडचिठ्ठी …. लवकरचं मशाल घेणार हाती
सावंतवाडी (प्रतिनिधी)
माजी आमदार राजन तेली यांच्या पाठोपाठ आता भाजपचे सावंतवाडी येथील पदाधिकारी निशांत तोरसकर यांनी भाजपला सोडत सोडचिठ्ठी दिली असून लवकरच ते ठाकरे सेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समजली आहे. राजन तेली बाहेर पडल्यानंतर आता भाजप मधून काही पदाधिकारी बाहेर पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान भाजपमधील कोणत्याही नेत्यांवर आपला नाराज नसून फक्त गटबाजीला आपण कंटाळून बाहेर पडत असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केले.