मळेवाड पंचकोशी नाभिक संघटनेचा सत्कार कार्यक्रम मळेवाड येथे झाला संपन्न झाला

131
सावंतवाडी (मंगल कामत) २९ऑगस्ट २०२४

मळेवाड पंचकोशी नाभिक संघटनेचा सत्कार कार्यक्रम मळेवाड येथे झाला संपन्न झाला

सावंतवाडी – सावंतवाडी तालुका नाभिक संघटना विभाग मळेवाड पंचक्रोशी नाभिक संघटनेकडून आपल्या न्याती बांधण्यासाठी एक छोटेखानी मेळाव्या आयोजित करून त्यात होतकरू व्यवसायिकांचा सत्कारही आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम मुळेवाडी येथील श्री गजानन महाराज पतीत पावन भक्ती मन भक्ती मंदिर येथे संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे व सुरेश पाटील उपस्थित होते.मराठे यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना दिवसेंदिवस नाभिक बांधव जो आपला पारंपारिक व्यवसाय करत आहेत. त्यामध्ये अनेक समस्या याठिकाणी निर्माण होत असून परप्रांतीय लोकांची अनेक ठिकाणी दुकानं वाढत असून ही एक मोठी समस्या भविष्यात नाभिक समाजासमोर उभी राहणार आहे.
त्यामुळे नाभिक समाजाने पारंपरिक केस कापण्याचा व्यवसाय करतात त्यामध्ये नवनवीन उपकरणांचा वापर करून आपल्या व्यवसायात कशी वाढ होईल या दृष्टीने विचार करून योग्य पावला उचलणं काळाची गरज आहे.तसेच भविष्यातही आपल्या संघटनेला कोणत्या प्रकारची मदत लागल्यास आपण नेहमी आपल्याला मदत करू असेही आश्वासन हेमंत मराठे यांनी दिले.या मेळाव्यात मळेवाड पंचकोशी नाभिक संघटने मधील सर्व सभासदांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच होतकरू ज्येष्ठ व्यावसायिक पुरुषोत्तम न्हावी,उत्तम न्हावेलकर, लक्ष्मण न्हावी,सखाराम चव्हाण याचे सत्कार करण्यात आला.याप्रसंगी मळेवाड पंचक्रोशी नाभिक विभाग अध्यक्ष- अजय न्हावी,उपाध्यक्ष-नवनाथ तिरोडकर, सचिव-आनंद न्हावेलकर,खजिनदार-संदेश आरोसकर,सल्लागार-सुनील न्हावेलकर भूषण न्हावेलकर,नंदकिशोर चव्हाण , आनंद न्हावी, अमोल न्हावी, अमित न्हावी, अनिल तळवणेकर , सिद्धेश न्हावी हे सर्व उपस्थित होते.सूत्रसंचालनाचे काम नवनाथ तिरोडकर यांनी पार पाडले.