माडखोल येथील अपघातात मुंबईतील युवक जखमी…!

सिंधुदुर्ग : दुचाकी आणि इको यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात मुंबईतील युवक जखमी झाला आहे. हा अपघात आज सायंकाळच्या सुमारास माडखोल येथे घडला. कुणाल फौजदार, असे जखमीचे नाव आहे. तर या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान घटनास्थळी अद्याप पोलीस पोहचले नसल्यामुळे दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरच आहेत. त्यामुळे सावंतवाडी-आंबोली मार्गावरून होणाऱ्या वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित दुचाकीस्वार युवक मुंबई येथून आला होतो. तो शिरोड्याच्या दिशेने जात होता. तर इको कार गोवा येथून कोल्हापूरला जात होती. दरम्यान या दोन्ही वाहनांची माडखोल येथे समोरासमोर जोरदार धडक झाली. यात दुचाकी चालक कुणाल हा जखमी झाला आहे. तर दोन्ही गाड्यांचे अपघातात मोठे नुकसान झाले. अपघातानंतर दोन्ही गाड्या रस्त्यावर राहिल्याने त्याचा वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. मात्र पोलिस अद्याप घटनास्थळी दाखल झाले नाहीत.