कोकण रेल्वेने परवानगी दिल्यास प्लॅटफॉर्मवर शेड बांधणार – पालकमंत्री रवींद्र चव्हाण

17

कणकवली दि ९ ऑगस्ट (तुळशीदास कुडतरकर)

कोकण रेल्वेने परवानगी दिल्यास प्लॅटफॉर्मवर शेड बांधणार – पालकमंत्री रवींद्र चव्हाण

 

कोकण रेल्वे प्रशासनाने प्रायोगिक तत्वावर कणकवली, कुडाळ, सिंधुदुर्गनगरी आणि सावंतवाडी या चा स्थानकांच्या बाहेरील भागाच्या सुशोभिकरणाला परवानगी दिली आहे. जर रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्मवर शेड बांधण्यासाठी परवानगी दिली तर एक वर्षभराच्या आत काम केलं जाईल. असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले.

कणकवली रेल्वे स्थानकासमोरील सुशोभिकरणाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी खासदार नारायण राणे, आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, कोकण रेल्वेचे सहसंचालक आर. के. हेगडे, राव, कांबळे, सार्वजनिक बांधकामच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, उपअभियंता विनायक जोशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, माजी आमदार राजन तेली, अॅड. अजित गोगटे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जिल्हाध्यक्ष अबिद नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले की,
मुंबईतून प्रवासी इथल्या स्थानकात उतरल्यानंतर बाहेर कुठे जायचे. बस कुठे थांबणार याची माहिती होत नव्हती. स्थानकाबाहेर छप्पर नसल्याने पावसात प्रवाशांच्या छत्र्या उडून जात होत्या.

स्थानकातील रस्ते खड्डेमय होते. या सर्व सुविधांच्या निर्मितीसाठी रेल्वे प्रशासनाकडे निधी नाही. त्यामुळे आम्ही पुढाकार घेऊन कोकण रेल्वे मार्गावरील प्रमुख १२ रेल्वे स्थानके सुशोभिकरणासाठी निश्चित केली. यातील चार रेल्वे स्थानकांच्या सुशोभिकरणाला कोकण रेल्वे प्रशासनाने मंजूरी दिली.

रेल्वे प्रशासनाने फक्त स्थानकाच्या बाहेरील भागाच्या सुशोभिकरणाला आणि सुविधांच्या निर्मितीला परवानगी दिली आहे. जर रेल्वे प्रशासनाने अंतर्गत भागात सुविधांची परवानगी दिली तर प्रमुख स्थानकांवर छप्पर बांधून देण्याचीही आमची तयारी आहे, असे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी जाहीर केले.

की