कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात भुरट्या चोरीचे प्रमाण वाढले असून स्थानिक पोलिसांना या चोरट्यांचे आवाहन बनले आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास अणाव घाटचेपेड वाडीतील मराठी शाळेत चोरट्याने खिडकी तोडून आत मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.
सकाळीच या शाळेत पाहणी केली असता खिडक्या तुटलेल्या दिसल्या काही दिवसांपूर्वीच सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी भुरट्या चोऱ्या करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या, मात्र परत एकदा या चोरट्यानी आपलं धाडस दाखवलं असून पोलिसांना चक्क आवाहन केलं असल्याचे दिसून येत आहे. या भुरट्या चोरांच्या मुसक्या पोलीस आवळतील का असा प्रश्न आता येथील ग्रामस्थांना पडला आहे.





