प्राथमिक शिक्षकांच्या चार टप्प्यात 1082 बदल्या…!

सिंधुदुर्ग : एकाच शाळेत पाच वर्षे आणि कार्यक्षेत्रात 10 किंवा त्यापेक्षा जास्त वर्षे कार्यरत शिक्षकांच्या बदलीचा महत्त्वाचा टप्पा पार पडला असून यात एकूण 736 प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत.

डिसेंबर महिन्यात सुरू झालेल्या या ऑनलाइन बदली प्रक्रियेत आतापर्यंत सवर्ग निहाय चार टप्प्यात एकूण 1082, शिक्षकांच्या बदल्या झाल्या असून 27 फेब्रुवारी रोजी अंतिम आदेश पारित केला जाणार आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची जिल्हा अंतर्गत ऑनलाइन बदली प्रक्रिया शासनाकडून हाती घेण्यात आली आहे. हि बदली प्रक्रिया विशेष संवर्ग, पती-पत्नी एकत्रीकरण, अवघड क्षेत्रातील बदली, पात्र शिक्षक, विस्थापित शिक्षक, जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे,अशा सहा टप्प्यात केली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.