ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने कणकवली मतदार संघातील गुणवंत विद्यार्थांचे होणार सत्कार
देवगड तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न
कणकवली (तुळशीदास कुडतरकर) दि १२ जुलै २०२४
शिवसेना उद्भव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कणकवली विधानसभा मतदार संघातील
कणकवली देवगड व वैभववाडी या तिन्ही तालुक्यात विविध सामाजिक, कला क्रीडा, शैक्षणिक,आरोग्यविषयक उपक्रमांनी १२ ते १४ जुलै २०२४ या कालावधित साजरा करण्यात येणार आहे. शुक्रवार दिनांक १२ जुलै २०२४ रोजी देवगड तालुक्यातील १० वी आणि १२ वी पास झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय, जामसंडे येथे तर शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
शनिवार दिनांक १३ जुलै २०२४ रोजी वैभववाडी तालुक्यातील १० वी आणि १२ वी पास झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकरभवन, एस टी स्टँड शेजारी येथे सकाळी १०:३० वाजता होणार आहे.तसेच रविवार दि.१४ जुलै २०२४ रोजी कणकवली तालुक्यात भगवती मंगल कार्यालय, कणकवली येथे सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत कै.सुबोध टिकले स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिर,सकाळी १० ते ११ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच११ ते १२ या वेळेत १०० टक्के निकाल देणाऱ्या शिक्षण संस्थांचा सन्मान देखील करण्यात येणार आहे.आदी कार्यक्रम होणार आहेत.या कार्यक्रमास शिवसेना सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत, जिल्हा संपर्क अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, तालुकाप्रमुख मिलिंद साटम. आदीसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.





