दुचाकी व टाटा मॅजिकचा भीषण अपघात | तीन ठार , दहा जखमी

अमरावती : अमरावती जिल्ह्य़ातील धामणगाव रेल्वे येथे टाटा मॅजिक मिनी डोअर आणि दुचाकीची जबर धडक झाल्याने भीषण अपघात झाला. या घटनेत तीन जण ठार तर दहा गंभीर जखमी झाले आहेत. धामणगाव यवतमाळ रोडवरील आसेगावजवळ हा भीषण अपघात झाला.

किरकोळ जखमींना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय धामणगाव येथे तर गंभीर जखमींना अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.