वरळी मध्ये विजय माझाच : आदित्य ठाकरे

मुंबई : शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी वरळीत होत असलेल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या सभेवरून जोरदार उपहासात्मक टीका केली. वरळीत ते गल्लीगल्लीत फिरले तरी विजय आपलाच होणार आहे. कितीही नेते येऊदे वरळीत फरक पडणार नाही ,9 असं आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरेंच्या संवाद यात्रेचा आज दुसरा दिवस आहे. नाशिकच्या चांदोरी येथे आजोजित सभेत ते बोलत होते. पाठीवर वार करुन मला विरोधी पक्षात बसवलं. वरळीतून लढणं जमत नव्हतं तर मला फोन करुन सांगायचं, ठाण्यात येऊन लढलो असतो, असा टोला आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

मला मोठ्या सभा घ्यायच्या नाहीत, मला अशाच छोट्या सभा घ्यायच्या आहेत. मोठ्या सभा घेतल्या तर नागरिकांशी जाता येत नाही. बुरा वक्त आया है, वो भी जायेगा. गद्दार आणि मुख्यमंत्री सभा घेतात तेव्हा खोके वाटले जातात पण तरीही खुर्च्या रिकाम्या असतात. पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा आपल्याकडे होते तिकडे पण होते. ही घोषणा क्सिली तरी मी इथेच आहे. पण ते गद्दार पळून जातात किंवा घोषणा देणाऱ्याला पोलीस पकडतात. दुःख याचं नाही की उद्योग बाहेर गेले; पण राजकीय अस्थिरत्यामुळे रोजगार येत नाहीत. कधीही एवढं घाणेरडं राजकारण महाराष्ट्रात नव्हतं, अशी खंत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. माझ्याकडे देण्यासारखं काही नाही मी तुमच्याकडून घ्यायला आलेलो आहे. आशीर्वाद तुम्ही मला द्या. गलिच्छ राजकारण सुरू आहे. हे राजकारण बदलायचं आहे. जेव्हा तुम्ही मला भेटता बोलता तेव्हा वाटतं की महाराष्ट्राला सुवर्णकाळ येईल; पण महाराष्ट्राचा सुवर्णकाळ हरवला आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.