शिष्यवृत्ती परीक्षेत जामसंडे गोगटे हायस्कूलच्या मनोमय मुणगेकर व उदी कुळकर्णीचे यश

0

देवगड दि ३ जुलै २०२४ (स्वप्नील लोके )

शिष्यवृत्ती परीक्षेत जामसंडे गोगटे हायस्कूलच्या मनोमय मुणगेकर व उदी कुळकर्णीचे यश

 

फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता – ५ वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृती परीक्षेत जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेच्या कुमार – मनोमय मृत्युंजय मुणगेकर (इयत्ता – ५ वी ) , व कुमारी – उदी उमेश कुलकर्णी ( इयत्ता – ८ वी ) या दोन्ही विद्यार्थ्यांनी शहरी सर्वसाधारण गटात शिष्यवृत्ती पटकावली आहे .
यशस्वी विद्यार्थ्यांना श्री.एम.आर.गिरकर ,सौ. एस.एस.राऊत ,श्री. एस.एस.पांचाळ ,सौ.पी.एन.चव्हाण ,श्री. व्ही.एन.जाधव ,श्री.एम.के.सनगाळे , श्री.पी.एन.हिरनाईक सौ.आर.आर.वालकर ,सौ.एम.एम.मुणगेकर ,श्री .अरुण फडके ,व सौ.समीक्षा गोगटे यांचे मार्गदर्शन लाभले.

यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष ऍड अजितराव गोगटे , सचिव – प्रविण जोग , शाळा समिती अध्यक्ष प्रसाद मोंडकर व मुख्याध्यापक श्री.संजय गोगटे यांनी अभिनंदन केले आहे .