माजगाव सरपंच यांच्या उपोषणाला या ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसपंच यांनी दिला पाठिंबा
सावंतवाडी (प्रतिनिधी) २ जुलै २०२४
माजगाव ग्रामपंचायत सरपंच यांनी ग्रामसेवक कायमस्वरूपी ग्रामसेवक मिळण्यासाठी पंचायत समिती समोर सुरू केलेल्या उपोषणाला जाहीर पाठिंबा असल्याचे मळेवाड कोंडुरे सरपंच मिलन पार्सेकर उपसरपंच हेमंत मराठे यांनी जाहीर केले आहे.
गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायतला कायमस्वरूपी ग्राम विस्तार अधिकारी नसल्याने दुसऱ्या ग्रामसेवक यांच्याकडे तात्पुरता कार्यभार देण्यात आल्याने बरीच कामे रखडली आहेत.माजगाव ग्रामपंचायतच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा देत असताना उद्या मळेवाड कोंडुरे सरपंच व उपसरपंच सदर उपोषणामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती पार्सेकर यांनी दिली.मळेवाड कोंडूरे ग्रामपंचायत कडून ग्रामसेवक नियुक्ती करिता भिक मागो आंदोलन जिल्हा परिषद समोर उभारण्याचा इशारा सरपंच पार्सेकर व उपसरपंच मराठे यांनी दिला आहे.





