निसर्गसंवर्धनाचे धडे विद्यार्थ्यांना देणे ही आता काळाची गरज :- विद्याधर तायशेटे

15

देवगड (प्रतिनिधी)

निसर्गसंवर्धनाचे धडे विद्यार्थ्यांना देणे ही आता काळाची गरज :- विद्याधर तायशेटे

देवगड रोटरी क्लबच्यावतीने ९ माध्यमिक शाळाना २०० वृक्षाचे वितरण

 

बेसुमार जंगल वृक्षतोडीमुळे ग्लोबल वार्मिंगचे परिणाम वातावरणातील बदलातून जाणवत आहेत. मानवी जीवनासाठी धोक्याची घंटा असून प्रत्येकाची जबाबदारी नुसती वृक्षारोपण करण्यापुरतीच मर्यादित नसून त्यांचे योग्यरीतीने संवर्धन होणे गरजेचे आहे. शालेय जीवनापासूनच निसर्गसंवर्धनाचे धडे विद्यार्थ्यांना देणे ही आता काळाची गरज आहे. जिल्ह्यात १० रोटरी क्लबच्या माध्यमातून दरवर्षी १० हजार अशी पाच वर्षात ५०हजार वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केलेला आहे. शालेय उपक्रमातही रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड सहकार्य करेल असे प्रतिपादन रोटरी क्लबचे असिस्टंट गव्हर्नर डॉ. विद्याधर तायशेटे यांनी शिरगाव हायस्कूल येथे केले.
रोटेरियन रविशंकर डोकोजू यांच्या “डोकोजू’ज धन्यवाद” या संस्थेमार्फत १०,००० झाडे रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १० रोटरी क्लब्सना प्रत्येकी १००० याप्रमाणे झाडे वितरित करण्यात आली त्यापैकी २०० झाडांचे वाटप रोटरी क्लब ऑफ मँगोसिटी देवगडच्यावतीने शुक्रवारी शिरगाव हायस्कूल येथे दशक्रोशीतील ९ हायस्कूल्सना प्रत्येकी २१ झाडे याप्रमाणे वितरीत करण्यात आली. यावेळी शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे उपाध्यक्ष संभाजी साटम म्हणाले चांगल्या सुविधा, योग्य मार्गदर्शन, शिस्तबद्धरितीने राबविलेले उपक्रम अस समाजाभमुख केलेलं काम तसेच गरजवंताला तात्काळ मदत पोहोचवण्याचे रोटरी क्लबचे कार्य प्रेरणादायी आहे. केलेली मदत नेहमीच स्मरणात राहते. चांगल्या उपक्रमांना सर्वांनी सहकार्य करावे. डोंगराळ भागात सिडबॉल टाकून झाडे लावण्याचा उपक्रमही यासंस्थेने हाती घ्यावा. असे मनोगत व्यक्त केले. रोटरी क्लब ऑफ मॅगोसिटी देवगडचे अध्यक्ष प्रविण पोकळे म्हणाले, शिरगांव हायस्कूलने रोटरी क्लबच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला आहे. रोटरी क्लबच्यावतीने चित्रकला स्पर्धा, ब्लॅकेट वाटप, आरोग्य, शैक्षणिक, श्रावण सोमवारी आरोग्य शिबिर रक्तदान शिबीर असे उपक्रम राबविले जात आहेत. वृक्षारोपणाच्या उपक्रमाला रोटरी क्लब कुडाळ, असिस्टंट गव्हर्नर राजन बोभाटे, गजा कांदळगावकर, प्रणय तेली याचे सहकार्य लाभले आहे.
कार्यक्रमास रोटरी क्लबचे असिस्टंट गव्हर्नर डॉ. विद्याधर तायशेटे रोटरी क्लब देवगडचे अध्यक्ष प्रवीण पोकळे माजी अध्यक्ष श्रीपाद पारकर कोषाध्यक्ष अनुश्री पारकर संस्था उपाध्यक्ष संभाजी साटम शिरगाव हायस्कूलचे प्राचार्य शमशुद्दीन अत्तार पर्यवेक्षक उदयसिंग रावराणे विजय बंदिवडेकर (सेक्रेटरी – रोटरी क्लब देवगड )अनिल कोरगावकर (खजिनदार – रोटरी क्लब देवगड )
आदी उपस्थित होते.