Home बांदा बांदा येथील बहुचर्चित साईड रोडचा प्रश्न अखेर निकाली ; यशस्वी शिष्टाईने दुपदरीकरणाचा...

बांदा येथील बहुचर्चित साईड रोडचा प्रश्न अखेर निकाली ; यशस्वी शिष्टाईने दुपदरीकरणाचा मार्ग मोकळा

18

 

बांदा (हेमंत मराठे)१ जुलै २०२४

बांदा येथील बहुचर्चित साईड रोडचा प्रश्न अखेर निकाली ; यशस्वी शिष्टाईने दुपदरीकरणाचा मार्ग मोकळा

बांदा येथे राष्ट्रीय महामार्गावर नियोजित उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर असतानाच येथील एका साईड रोडचा प्रश्न हा गेले कित्येक महिने चर्चेचा विषय ठरला होता. या विषयावरून गावात वादंग निर्माण झाला होता.याची गांभीर्यता लक्षात घेत व स्थानिक बांदावासीयांची होणारी गैरसोय यांचा विचार करत बांदा ग्रामपंचायत सरपंच प्रियांका नाईक,सामाजिक कार्यकर्ते गुरु कल्याणकर,सदस्य प्रशांत बांदेकर, रत्नाकर आगलावे व यांनी आज संबंधित जागा मालक,कॉन्ट्रॅक्टर यांच्याशी बैठक घेत यशस्वी शिष्टाई करत सदर रस्ता दुपदरी करण्याकरता येणाऱ्या अडचणी दूर करत प्रश्न मार्गी लावला. गेली अनेक महिने खितपत पडलेला प्रश्न सोडवल्याने बांद्यातील व पंचक्रोशीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.यावेळी बोलताना बांदा सरपंच प्रियांका नाईक यांनी सांगितले की,हा प्रश्न सामोपचाराने सुटला ही आनंदाची गोष्ट आहे. यापुढे देखील आपला बांदा गावासमोरील महत्वाचे प्रश्न अशाच पद्धतीने सलोख्याने सोडवत इतरांसमोर एक चांगला आदर्श घालून देऊ.आज हा प्रश्न मार्गी लागला त्याबद्दल संबंधित जागा मालक व इतर नागरिकांचे त्यांनी आभार मानले. यावेळी सरपंच प्रियांका नाईक,गुरु कल्याणकर,प्रशांत बांदेकर,रत्नाकर आगलावे, हेमंत दाभोळकर,शामसुंदर धुरी,मोहन धुरी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.