बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण ॲक्शन मोडमध्ये

मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. सत्यजीत तांबे यांना डावलल्यामुळे तांबे कुटुंबाने प्रदेश काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांचे मामा तथा काँग्रेसमधील वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. थोरात यांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. काँग्रेसधील याच अंतर्गत राजकारणावर आता काँग्रेसचे नेते अशोच चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याबद्दल आत्ताच कळालं असून त्यांचा राजीनामा ही दुर्दैवी बाब आहे. आज थोरात यांचा वाढदिवस असून सकाळीच मी त्यांना शुभेच्छा दिल्या. थोरात यांची मनधरणी करण्यासाठी मी पुढाकार घेणार आहे. कॉंग्रेस पक्ष वाढीसाठी सर्व काही करणार आहे,”  असे अशोक चव्हाण म्हणाले. तसेच थोरात पक्ष सोडून जाणार नाहीत, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.