नांदगाव तिठा येथे चिरे वाहतूक ट्रकला अपघात

293

नांदगाव तिठा येथे चिरे वाहतूक ट्रकला अपघात

कणकवली ( प्रतिनिधी)
कणकवली तालुक्यातील देवगड निपाणी महामार्गावर नांदगाव तिठा येथे उपसरपंच इरफान साटविलकर यांच्या घराजवळ शनिवारी रात्री 10 च्या सुमारास चिरे वाहतूक करणारा ट्रक रस्त्याला साईट पट्टी नसल्याने घसरला आहे. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही तसेच हा रहदारीचा रस्ता व बाजूला घरांची वर्दळ असली तरी त्यावेळी कोणीही नसल्याने पुढील अनर्थ टळला आहे. जर रस्त्याला साईटपट्टी योग्य असेल तर असे अपघात होणार नाही. तरी लवकरच संबंधित विभागाने साईट पट्टी योग्य करावी अशी मागणी उपसरपंच इरफान साटविलकर यांनी केली आहे.