मालवण जेटी येथे बुडणाऱ्या पर्यटकांचा वाचविला जीव ; हर्ष कुबल याच्या धाडसाचे कौतुक

108
Oplus_0

मालवण जेटी येथे बुडणाऱ्या पर्यटकांचा वाचविला जीव ; हर्ष कुबल याच्या धाडसाचे कौतुक

हर्ष देवगड शेठ. म.ग.हायस्कूलचा विद्यार्थी असल्याने प्रशालेच्या वतीने केला गौरव

 

देवगड (प्रतिनिधी) २३ जून २०२४
देवगड येथील शेठ म.ग.हायस्कूल मध्ये इयत्ता आठवी मध्ये शिकणारा हर्ष शिवाजी कुबल याने मे महिन्यामध्ये मालवण येथील जेटीवर बुडणाऱ्या एका पर्यटकांचा जीव वाचविल्याबद्दल संस्थेच्या स्थानीय समितीचे सचिव आणि समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. अविनाश माणगावकर यांच्या शुभहस्ते शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी देवगड एज्युकेशन बोर्डाचे उपाध्यक्ष सदानंद पवार, संस्थेचे मुख्य चिटणीस शंकर धुरी, मुख्याध्यापक महादेव घोलराखे पर्यवेक्षिका निशा दहिबावकर, शिक्षक वर्ग आणि हर्ष चे पालक उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी हर्ष कुबल याच्या धाडसाचे कौतुक करून भविष्यात देखील अशाच प्रकारची सहकार्यवृत्ती अंगी जोपासण्याचे आवाहन केले.