चिरे वाहतूक करणाऱ्या ट्रकला शिरगाव धोपटेवाडी येथे अपघात

86

चिरे वाहतूक करणाऱ्या ट्रकला शिरगाव धोपटेवाडी येथे अपघात

देवगड (प्रतिनिधी)दि.२१ जून २०२४

शिरगाव धोपटेवाडी येथे असलेल्या नर्सरी नजीक लिंगडाळ येथून राधानगरीच्या दिशेने चिरे वाहतूक करणाऱ्या ट्रकला समोरून येणाऱ्या ट्रकने हुलकावणी दिल्याने ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक रस्त्याच्या एका बाजूला पलटी झाला. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी सव्वासहाच्या दरम्याने झाला. मात्र या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.
उपलब्ध झालेल्या माहितीनुसार
चांदोशीहून राधानगरीच्या दिशेने चिरे वाहतूक करणाऱ्या ट्रकला निपाणी होऊन देवगडच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने हुलकावणी दिल्याने राधानगरीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक चालकाच्या ट्रक वरील ताबा सुटल्याने ट्रक रस्त्याच्या डाव्या बाजूने पलटी होऊन अपघात झाला.
या अपघातात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसून ट्रकचे पलटी झाल्याने मोठे नुकसान झाले आहे