भाजप कामगार मोर्चा,सेवाशक्ती संघर्ष एसटी संघटनेच्या वतीने खा.नारायण राणे यांचा सत्कार 

41

भाजप कामगार मोर्चा,सेवाशक्ती संघर्ष एसटी संघटनेच्या वतीने खा.नारायण राणे यांचा सत्कार 

कणकवली (प्रतिनिधी) १८ जून २०२४
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे आपले नवनिर्वाचित लाडके खासदार व माजी केंद्रीय मंत्री आदरणीय नारायण राणे साहेब हे भरघोस मताधिक्याने निवडून आल्याबद्दल भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा सिंधुदूर्गच्या वतीने आणि सेवाशक्ती संघर्ष एसटी संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
यावेळी सिंधुदूर्ग भाजप कामगार मोर्चा जिल्हा अध्यक्ष अशोक राणे, सिंधुदूर्ग कामगार मोर्चा जिल्हा सचिव रोहन गुरव, सेवाशक्ती संघर्ष युनियन जिल्हा कार्याध्यक्ष संतोष भाट, सेवाशक्ती संघर्ष युनियन देवगड सचिव साईनाथ ओटवकर, कामगार मोर्चा देवगड उपाध्यक्ष प्रकाश उर्फ राजा बागवे, पी. डी. परब, अनिल कांबळी, अरुणोदय पिळणकर, साईनाथ खंडेराय, सुशील कदम, ओंकार वायंगणकर, सागर राणे, दाजी इंदप उपस्थित होते.