शिरोडा मार्गावर तिरोडा तिठा येथे ओमनीचा टायर फुटल्याने अपघात
मळेवाड शिरोडा मार्गावर तिरोडा तिठा येथे ओमनी गाडीचा टायर फुटल्याने अपघात झाला.गोवाहून शिरोड्याच्या दिशेने जाणाऱ्या ओमनी गाडीचा टायर फुटल्याने शिरोड्याहून मळेवाड च्या दिशेने जाणाऱ्या चार चाकीला ओमनीने धडक दिल्याने अपघात झाला.यात एकूण 5 जण जखमी झाले असून यात एका महिन्याच्या बाळाचा समावेश आहे.जखमीना शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात व मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात अधिक उपचारासाठी हलविण्यात आले.या अपघातात दोन्ही गाड्याचे मोठे नुकसान झाले आहे.