देवगड, (स्वप्नील लोके)दि.१० जून
जामसंडे वेळवाडी येथील राजन दहिबावकर यांच्या घराचे छप्पर मुसळधार पावसामुळे कोसळले
युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक , नगरसेवक बुवा तारी यांनी केली पाहणी
देवगड मध्ये शनिवारी पावसाने जोरदार धुमाकूळ घातला पाऊस सुरू झाल्यानंतर प्रथमच पावसाने दीडशे चा टप्पा ओलांडला असून रविवारी सकाळी १५८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे वेळवाडी येथील राजन भिकाजी दहीबावकर यांच्या घराच्या छपराचा काही भाग कोसळून दहिबावकर यांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,उपतालकप्रमुख बुवा तारी यांनी वेळवाडी येथील दहिबावकर यांच्या निवासस्थानी सोमवारी जात घराची पाहणी केली.
यामध्ये दहिबावकर यांच्या छपराचा काही भाग कोसळून मोठे नुकसान झाले आहे. पावसाचा जोर कायम असल्यामुळे घरातील जीवनावश्यक वस्तू भिजल्यामुळे त्याचे देखील नुकसान झाले आहे.







