पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांचा असाही प्रामाणिकपणा…!

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गनगरी पोलीस पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना रस्त्यावर सापडलेला मोबाईल ओरोस पोलीस स्टेशनच्या अधिकारी वर्गाकडे जमा केला. व पोलीस प्रशासनाने  मोबाईल नंबरवर संपर्क साधून पुन्हा मालकाकडे देण्यात आला.

सिंधुदुर्गनगरी ते सुकळवाड असा प्रवास करताना चिन्मय दळवी. रा. सुकळवाड, यांचा मोबाईल  नक्षत्र हॉटेल जिल्हा रुग्णालय हॉस्पिटलच्या परिसरात हरवला होता. तो मोबाईल सिंधुदुर्गनगरी पोलीस पेट्रोल पंप येथील कर्मचारी काही कामानिमित्त जिल्हा रुग्णालयात येथे  गेले असता हा मोबाईल सापडला होता. मिळालेला मोबाईल विनोद, दत्ताराम व राऊळ  या कर्मचाऱ्यांनी ओरोस पोलीस स्टेशन यांच्याकडे सुपुर्द केला.

पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी मोबाईल मालक चिन्मय दळवी,रा. सुकळवाड यांच्याशी संपर्क साधून तो मोबाईल मुळ  मालकाचा ताब्यात देण्यात आला. सिंधुदुर्गनगरी पोलीस  पेट्रोल पंप कर्मचारी यांचे पोलीस अधिकारी वर्गाकडून कौतुक करण्यात आले.

यावेळी सिंधुदुर्गनगरी  पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी, अश्विनी भोसले, रुपेश नाईक, योगेश मुंढे  यांनी पेट्रोल पंप कामगार  कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.