सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, सिंधुदुर्ग विभाग – देवगड तालुक्याच्या वतीने किल्ले विजयदुर्ग येथे ३५१ वा शिवराज्याभिषेक दिन साजरा
विजयदुर्ग (प्रतिनिधी)०६ जून २०२४
सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, सिंधुदुर्ग विभाग – देवगड तालुक्याच्या वतीने आज ०६ जून २०२४ रोजी किल्ले विजयदुर्ग येथे ३५१ वा शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. मराठा आरमाराची राजधानी असणारा ऐतिहासिक किल्ले विजयदुर्ग ज्यावर महाराजांचा पदस्पर्श देखील झाला होता आणी म्हणून ३५१ वा शिवराज्याभिषेक दिन किल्ले विजयदुर्गवर साजरा व्हावा अशी संकल्पना सह्याद्रीच्या दुर्गसेवकांच्या मनात आली. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी जे हिंदवी स्वराज्य उभ केल याच जिवंत उदाहरण म्हणजे हे उभे असणारे गडकिल्ले मात्र सध्याची अवस्था पहाता पुढील पिढीला महराजांचा इतिहास कळवा, समजावा म्हणून सह्याद्री प्रतिष्ठान हि संस्था गेली १५ वर्षे देव-देश-धर्म या त्रि-सूत्रावर गडकिल्ले जतन व संवर्धनाचे कार्य करत आहे. गडकिल्ले जतन व संवर्धन करताना महाराजांचा इतिहास जनसामान्य लोकापर्यंत पोहोचावा यासाठी अनेक उपक्रम संस्था राबिवत असते याचाच एक भाग म्हणजे आजचा कार्यक्रम होय. सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभाग – देवगड तालुक्याच्या वतीने आज दुर्गसेवकांनी सकाळी १०:०० वाजता गडपुजन व किल्ल्यातील देवतांचे पुजन करून मुख्य प्रवेशद्वारासस श्रीफळ वाढवून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. तदनंतर मान्यवर उपस्थित झालेवर १०:३० वा. विजयदुर्ग गावचे प्रथम नागरिक सरपंच श्री रियाझ काजी व माजी उपसरपंच श्री महेश बिडये यांच्या हस्ते महाराजांचा दुध व जल अभिषेक करण्यात आला. त्यानंतर महाराजांचा राज्याभिषेक करून विधिवत पुजा करण्यात आली, महाराजांचा ध्येय मंत्र, प्रेरणा मंत्र व शिव गारद देवून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवर यांचे दुर्गसेवकांच्या हस्ते गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले. उपस्थित यांना आजच्या कार्यक्रमाबाबत आणि संस्थेच्या कार्याबाबत माहिती देण्यात आली. होय… आम्ही मावळे स्वराज्याचे या शिरगाव येथील संस्थेच्या मुलांनी इतिहासकालीन युद्धकौशल्य म्हणजे लाठीकाठीचे प्रात्यक्षिक सादर करून महाराजांचा मानवंदना देण्यात आली. लाठीकाठी प्रात्यक्षिक सादर केल्यानंतर श्री दामाजी पाटील व श्री विश्वनाथ गडकर यांच्या हस्ते होय… आम्ही मावळे स्वराज्याचे या संस्थेचा शाल, श्रीफळ आणि किल्ले हनुमंतगड ची फ्रेम भेट देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर मुलांना किल्ले विजयदुर्ग चे दुर्गदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सदर कार्यक्रमास विजयदुर्ग गावचे सरपंच श्री रियाझ काजी, ग्रा पं सदस्य श्री सिद्धेश डोंगरे, विजयदुर्ग सोसायटीचे चेअरमन तथा माजी उपसरपंच श्री महेश बिडये, विजयदुर्ग गावाचे पोलीस पाटील श्री राकेश पाटील, विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाचे श्री चंद्रकांत बिडये, श्री विश्वनाथ गडकर, पुरातत्व विभागाचे प्रतिनिधी श्री यशपाल जैतापकर, शिवप्रेमी श्री संतोष टूकरुल, महेश जावकर, दामाजी पाटील, प्रसाद शेडगे, व सह्याद्रीचे दुर्गसेवक आदी असे ३०/४० शिवप्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभागाचे जिल्हा सचिव तथा देवगड तालुका प्रमुख श्री दिपक करंजे यांनी केले.