मोरगाव ते रेडी होत आहे मायनिंगची अवैध वाहतूक,प्रशासन सुस्त

180

मोरगाव ते रेडी होत आहे मायनिंगची अवैध वाहतूक,प्रशासन सुस्त

सावंतवाडी (प्रतिनिधी) दिनांक ५ जून २०२४

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी मायनिंगची लीज असून बरेच ठिकाणी मायनिंग प्रकल्प सुरू आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जैवविविधता व निसर्गसुंदरतेचा विचार केला तर खऱ्या अर्थाने मायनिंग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एक शाप म्हणावा लागेल.असे हे प्रकल्प जिल्ह्यात सुरू असतानाच प्रशासनला पूर्णपणे अंधारात ठेवून काही ठिकाणी अवैधपणे उत्खनन करून मायनिंगची वाहतूक करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत.ना उत्खनन करण्यासाठी कोणता परवाना किंवा ना वाहतूक करण्यासाठी परवाना.मोरगाव ते रेडी अशी अवैध मायनिंग वाहतूक केली जात असल्याची charcha सुरू आहे.गेले कित्येक दिवस ही वाहतूक सुरू असूनअद्याप पर्यंत प्रशासनला कोणताही प्रकारचा थांग पत्ता नाही हे नवलच.मात्र काही सजग ग्रामस्थांच्या ही गोष्ट निदर्शनास आल्यानंतर मळेवाड परिसरात या अवैध मायनिंग वाहतुकीची चर्चा सुरू आहे.रेडी मध्ये एका ठिकाणी जवळपास 500 हून अधिक डंपर अवैधरित्या मायनिंगसदृश्य माती साठा करून ठेवल्याची चर्चा आहे.एकीकडे होऊ घातलेले मायनिंग प्रकल्प आणि त्यातच चोरट्या मार्गाने उत्खनन करून त्यांची विना परवाना होणारी वाहतूक थांबलीच पाहिजे अशीही चर्चा आहे.अशा वाहतुकीवर प्रशासन कोणती कारवाई करतो हे महत्वाचे आहे/