कणकवली : शहरात बांधकरवाडी दत्तमंदिर रोड जवळ सोमवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास तेथे राहणाऱ्या एका भंगार व्यवसायिकाने लावलेली आग नजीक असलेल्या गवताला लागली. अन् आग अचानक भडकल्याने आगीने मोठ्या प्रमाणात पेट घेण्यास सुरुवात केली. या आगीत तेथील भंगाराचे काही साहित्य व तेथे असलेले माड आगीच्या भक्षस्थानी पडले.

दरम्यान आगीने रौद्ररूप धारण केलेले असतानाच, याबाबत माहिती मिळतात कन्झ्युमर्स सोसायटीचे चेअरमन संदीप नलावडे यांनी याबाबत तात्काळ नगराध्यक्ष समीर नलावडे यांना माहिती देत अग्निशमन बंब पाठवण्याची मागणी केली.
त्यानंतर काही क्षणातच कणकवली नगरपंचायत चा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन बंबच्या माध्यमातून आग आटोक्यात आणण्यात आली. सतर्कतेने आग आटोक्यात आणल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. या आग लागलेल्या भागाच्या आसपास वस्ती असल्याने होणारे संभाव्य नुकसान देखील टळले. यावेळी नगरपंचायत कर्मचारी यांच्यासह संदीप नलावडे, नवराज झेमने आदी उपस्थित होते.





