एकनाथ शिंदे यांनी भूषण परूळेकर यांच्याकडून देखील स्वीकारले स्वतंत्र स्वागत..!

कणकवली : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंगणेवाडी येथे भराडी देवीच्या दर्शनासाठी सिंधुदुर्गात उपस्थिती दर्शवली असताना मालवण चिवला बीच नजीक केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निलरत्न बंगल्यावर देखील मुख्यमंत्र्यांनी भेट देत नारायण राणे यांच्याशी चर्चा केली.

याप्रसंगी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, तालुकाप्रमुख भूषण परूळेकर यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.

कणकवली तालुकाप्रमुख भूषण परूळेकर यांच्याकडून देखील मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र स्वागत स्वीकारले. यावेळी कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर, माजी खास. निलेश राणे, दत्ता सामंत, आम. कालिदास कोळंबकर, रवींद्र फाटक यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.