सातोसे माऊलीचा 15 रोजी वर्धापनदिन सोहळा
बांदा : (मंगल कामत) १४ मे २०२४
सातोसे येथील श्री देवी माऊली पंचायतन देवस्थानचा वर्धापनदिन सोहळा बुधवार दि. 15 मे रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 वा. लघुरुद्र, दुपारी 12 वा. महाआरती, 1 वा. महाप्रसाद, 4 वा. स्थानिक भजने, संध्या. 5 वा. महिलांचा फुगडी कार्यक्रम, 7 वा. दीपोत्सवासह पालखी प्रदक्षिणा होणार आहे. रात्रो 9.30 वा. चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. भाविकांनी तसेच नाट्यप्रेमींनी सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देवी माऊली देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती, सातोसे ग्रामस्थ आणि श्री देवी माऊली ग्रामोत्कर्ष समिती मुंबई यांनी केले आहे.





