हायवे प्रकल्पग्रस्त महेश कोदे यांचे प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण…!

कणकवली : तालुक्यातील हायवे प्रकल्पग्रस्त महेश कोदे यांनी उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांच्या मनमानी कारभाराविरोधात सोमवारी प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण केले. कोर्टात केस चालू असतानाही अधिकाऱ्याने दोन ते चार लोकांना रक्कम अदा केली. ही बाब ज्यावेळी कोदे यांच्या लक्षात आली त्यावेळी कोदे यांनी माहिती अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती घेतली.

त्यानुसार त्यांनी ई – करारा मार्फत त्यांच्याकडून लिहून घेतले होते की, कोणी त्यांच्याविरुद्ध तक्रार केली तर ती रक्कम वसूल केली जाईल. त्यानुसार त्यांच्याकडील ती रक्कम जोपर्यंत वसूल होत नाही तोपर्यंत कोदे यांनी आमरण उपोषणाचा पवित्रा हाती घेऊन कणकवली प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले.