राणेंच्या प्रचारासाठी कणकवलीत ठाकरे उतरले मैदानात ; मैदान तेच फक्त ठाकरे बदलले
कणकवली ( प्रतिनिधी)
महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या जाहीर प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलुख मैदान तोफ आज कणकवलीत धडाडणार आहे. आज ४ मे रोजी सायंकाळी ६ वाजता कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर ही जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी जनसागर उपस्थिती राहणार आहे.
उद्धव ठाकरे यांनी उपजिल्हा रुग्णालया समोरील याच मैदानावर काल सभा घेतली होती.या सभेला जशास तसे आज ठाकरे यांच्याकडून दिले जाईल.त्यामुळे आजची ही सभा ऐकण्यासाठी श्रोतेवर्ग उत्सुक आहेत. दरम्यान शिवसेनेत असताना नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र बैठका जाहीर सभा झालेल्या होत्या. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही पहिली सभा एकाच व्यासपीठावर प्रथमच होत आहे.





