जिल्हा बँकेच्या सर्व शाखा आणि सोसायट्या यांचा‌ प्रचारासाठी आमदार नितेश राणेंनी केला राजकीय अड्डा – अतुल रावराणे 

14

जिल्हा बँकेच्या सर्व शाखा आणि सोसायट्या यांचा‌ प्रचारासाठी आमदार नितेश राणेंनी केला राजकीय अड्डा – अतुल रावराणे 

कणकवली दि 2‌ मे (प्रतिनिधी)

जिल्हा बँकेच्या सर्व शाखा आणि सोसायट्या यांचा निवडणुकीच्या प्रचारासाठी आमदार नितेश राणे यांच्या कडून वापर होत आहे. मतदारांना आणून त्यांना कर्ज मंजूर केले जात आहे. अनेकांना पैसेही वाटप केले जात आहेत. तर जप्तीच्या कारवाईची धमकी दिली जात आहे.‌अशी टिका ‌कणकवली विधानसभा संपर्क प्रमुख अतुल रावराणे यांनी आमदार नितेश राणे यांच्यावर केली.

कणकवली येथील शिवसेना कार्यालयात ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

पुढे बोलताना रावराणे म्हणाले,या सर्व प्रकारांबाबत आम्ही निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासन यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. त्याची दखल जिल्हा प्रशासनाने घ्यायला हवी. अन्यथा सोसायट्या, जिल्हा बँक शाखा यामध्ये सुरू असलेल्या बैठका आम्ही उधळून लावणार आहोत. असे त्यांनी सांगितले.

त्यावेळी होणारी राजकीय परिस्थिती तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडली तर त्याला जिल्हा प्रशासन जबाबदार असणार आहे.

रावराणे म्हणाले, राणेंकडून ठेकेदार आणि शासकीय अधिकाऱ्यांनाही धमकावले जात आहे. राणेंसाठी काम करा अन्यथा माझ्याशी वैयक्तिक दुष्मनी राहिल असा इशारा राणे देत आहेत. तर टेंडर झाले नसताना अनेक ठेकेदारांना वाडीनिहाय रस्ते डांबरीकरण करण्यास भाग पाडले जात आहे. सर्व नियम धाब्यावर असून
रस्त्यांची कामे केली जात आहेत. याविरोधातही आम्ही प्रशासनाकडे 
तक्रारी केल्या आहेत. तसेच सर्व नियमबाह्य कामांचीही आम्ही चौकशी लावणार आहोत.

वैभववाडी, देवगड, मिठबाव अशा अनेक ठिकाणच्या रस्त्यांचे टेंडर झाले नसताना अनेक ठेकेदाराना वाडीनिहाय रस्ते डांबरीकरण करण्यास भाग पाडले जात आहे. सर्व नियम धाब्‍यावर बसून रस्त्यांची कामे केली जात आहेत. याविरोधातही आम्‍ही प्रशासनाकदे तक्रार करणार आहोत. तसेच सर्व नियमबाह्य कामांचीही आम्‍ही चौकशी लावणार आहोत. असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील जनता ही कोणत्याही धमकी व प्रलोभनांना बळी पडणार नाही. खासदार विनायक राऊत बहुमताने विजयी होऊन विजयाची हॅट्रिक करणार आहेत नारायण राणे हे पुस्तक बंद होणार आहे, असे श्री. रावराणे यांनी सांगितले.