Home महाराष्ट्र कणकवली …..तर विरोधकांचे स्वप्न हे स्वप्नच राहणार – अशोक नेते

…..तर विरोधकांचे स्वप्न हे स्वप्नच राहणार – अशोक नेते

6

..तर विरोधकांचे स्वप्न हे स्वप्नच राहणार – अशोक नेते

 

कणकवली दि 2 एप्रिल ( प्रतिनिधी)

राणेंचा अडीच लाखांनी पराभव करू असे स्वप्न विरोधक पाहत आहेत. मात्र त्यांचे ते स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही असा विश्वास चिमूरचे खासदार तथा भाजप आदिवासी आघाडीचे राष्ट्रीय सरचिटणीस अशोक नेते यांनी आज व्यक्त केला.

श्री. नेते यांनी प्रहार भवन येथे महायुतीच्यावतीने पत्रकार परिषद घेतली. त्यांच्यासोबत भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, मनसेचे धीरज परब, नामदेव जाधव, अबिद नाईक, रमाकांत जाधव, राजू राऊळ आदी उपस्थित होते.

श्री. नेते म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या आघाडीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप नेत्यांवर चुकीच्या पद्धतीने टीका केली जात आहे. मात्र गेल्या दहा वर्षात मोदींनी विकास कामे करून या सर्व टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. एवढेच नव्हे तर गेल्या चाळीस वर्षात काँग्रेसला जे जमले नाही ते मोदींनी करून दाखवले आहे.

नेते म्हणाले, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा गेल्या दोन दिवसांत मी आढावा घेतला. यात भाजपयुतीचे उमेदवार नारायण राणे हे मोठ्या मताधिक्यांनी विजयी होतील अशी मला खात्री आहे. विरोधी आघाडीकडून राणेंचा अडीच लाखांनी पराभव करून असा प्रचार केला जात आहे. पण ते विरोधकांचे स्वप्नच राहणर आहे.

श्री.नेते म्हणाले, सभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या आघाडीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप नेत्यांवर चुकीच्या पद्धतीने टीका केली जात आहे. मात्र गेल्या दहा वर्षात मोदींनी विकास कामे करून या सर्व टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. एवढेच नव्हे तर गेल्या चाळीस वर्षात काँग्रेसला जे जमले नाही ते मोदींनी करून दाखवले आहे.

नेते म्हणाले, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा गेल्या दोन दिवसांत मी आढावा घेतला. यात भाजपयुतीचे उमेदवार नारायण राणे हे मोठ्या मताधिक्यांनी विजयी होतील अशी मला खात्री आहे. विरोधी आघाडीकडून राणेंचा अडीच लाखांनी पराभव करून असा प्रचार केला जात आहे. पण ते विरोधकांचे स्वप्नच राहणर आहे.

नेते म्हणाले, भाजपने चारशे पार जागा जिंकल्या तर ते संविधान बदलतील, आरक्षणाची टक्केवारी कमी करतील अशीही टीका केली जात आहे. मात्र ही टीका चुकीची आहे. गेले दहा वर्षे भाजप बहुमतात आहे. आम्हा ला संविधान बदलायचं असतं किंवा राखीव जागांचं आरक्षण कमी करायचं असतं तर ते काम आम्ही केव्हाच केलं असतं. पण आम्ही संविधानाचे पाईक आहोत. तसेच राखीव जागांनाही धक्का लागू देणार नाही.