श्री देव खांबलेश्वर मंदिराचा वर्धापन दिन 30 एप्रिल रोजी 

35

श्री देव खांबलेश्वर मंदिराचा वर्धापन दिन 30 एप्रिल रोजी 

बांदा प्रतिनिधी

माहेरवाशीनेच्या हाकेला धावणारा अशी ख्याती असलेला विलवडे(बांदा )येथील श्री देव खांबलेश्वर मंदिराचा वाढदिवस मंगळवार दिनांक 30 एप्रिल रोजी साजरा होत आहे यानिमित्ताने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
सकाळी आठ वाजता अभिषेक त्यानंतर श्री सत्यनारायणाची महापूजा दुपारी बारा वाजता महाआरती व तीर्थप्रसाद दुपारी एक वाजता महाप्रसाद रात्री ठीक दहा वाजता लोकराज्य सुधीर कलिंगड प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरुळ यांचा ट्रिक्स इन नाट्यप्रयोग व्यंकटेश पद्मावती हा होणार आहे.
तरी सर्व माहेरवाशींनी भाविक भक्त व नाट्य रसिकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे आव्हान श्रीदेवी माऊली देवस्थान कमिटी विलवडे पदाधिकाऱ्यांनी यांनी केलेले आहे.