मनसेचे कसाल विभाग प्रमुख प्रमोद परब यांचा आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश

143

मनसेचे कसाल विभाग प्रमुख प्रमोद परब यांचा आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश प्रमोद परब यांनी बांधले शिवबंधन

कसाल विभागात मनसेला खिंडार

कणकवली ( प्रतिनिधी)दिनांक २४ एप्रिल २०२४

मनसेचे कसाल विभागप्रमुख प्रमोद परब यांनी आज कणकवली विजय भवन येथे आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.यावेळी आमदार वैभव नाईक यांनी त्यांचे शिवसेनेत स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपजिल्हाप्रमुख बंडू ठाकूर, अवधूत मालणकर,पडवे माजी सरपंच प्रभाकर गोसावी,छोटू पारकर आदी उपस्थित होते.प्रमोद परब यांच्या शिवसेना प्रवेशामुळे कसाल विभागात मनसेला खिंडार पडले आहे.